देशातील सर्वात मोठा ४४ मॅगावॅटचा ३५० कोटी रूपयांचा प्रकल्प लवकरच वारणेच्या शेतकरी सभासदांच्या मालकीचा होणार : आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)…..!

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 27 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : 

देशातील सर्वात मोठा ४४ मॅगावॅटचा ३५० कोटी रूपयांचा प्रकल्प आपण वारणेमध्ये उभा केला. गेले ३ वर्षे हा प्रकल्प कारखान्याच्या मालकीचा करण्याचा प्रयत्न चालू आहे पण अनेक अडचणी येत होत्या. पण येत्या ४ दिवसात हा प्रकल्प आपल्या कारखान्याच्या मालकीचा होणार असुन वर्षाला १०० कोटी रुपयांचे नवे उत्पन्न देणारी संस्था आज वारणेच्या शेतकरी सभासदांच्या मालकीची होणार आहे यांचा आनंद माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला होत आहे. व वारणा अडचणीच्या काळातून बाहेर पडत असतानाचा इतिहास लिहला गेला तर या अडचणीच्या काळात घुणकी गावाने दिलेली साथ ही सुवर्ण अक्षरांनी लिहावी लागेल असे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी बोलताना सांगितले…

यावेळी वारणा सहकारी बँकेचे चेअरमन मा. निपुणरावजी विलासराव कोरे (दादा), सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे व्हा. चेअरमन एच.आर. जाधव, वारणा सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन उत्तम पाटील, , वारणा साखर कारखाना संचालक रावसो पाटील, श्रीनिवास डोईजड, शहाजी पाटील, सुभाष पाटील, सुभाष जाधव, उदय पाटील, सुभाष पाटील, रविंद्र जाधव, प्रदीप तोडकर, डॉ. प्रताप पाटील, शामराव पाटील, किशोर पाटील, काकासो चव्हाण, विजय पाटील, संदिप जाधव, विजय धनवडे, सुभाष कणसे, सौ. रंजना पाटील, सौ. वैशाली पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत व घुणकी गावातील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *