Share Now
Read Time:1 Minute, 17 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूर ते मुंबई (गिरगाव) पर्यंत आयोजित केलेल्या शाहू विचार जागर रथरात्रेची सुरवात शाहू महाराजांचा जयघोष, शाहिरी पोवाडा अशा जल्लोषमय वातावरणात आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
आज कोल्हापुरातून सुरु झालेली हि रथयात्रा कराड, सातारा, पुणे, मुंबई मार्गावरील गावांमध्ये शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करत गिरगावापर्यंत (शाहू महाराजांचे निधन झालेले ठिकाण खेतवाडी, गिरगाव) पर्यंत जाणार आहे.
यावेळी, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आ. जयश्री जाधव, मालोजीराजे छत्रपती तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
Share Now