राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त शहरात स्वच्छता मोहिम…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 32 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी,ता.४ : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त महापालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने शहरात स्वच्छता मोहिम राबविली. यामध्ये शहरातील प्रेक्षणिय स्थळे, वारसा स्थळे, मुख्य रस्ते, चौक या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली हि स्वच्छता मोहिम करण्यात आली. सदरची स्वच्छता मोहिम पंचगंगा नदी घाट परीसर, महालक्ष्मी मंदीर परीसर, कोटीतीर्थ तलाव परिसर, खासबाग मैदान परीसर, न्यु पॅलेस परीसर, गांधी मैदान परिसर, शाहु समाधी स्थळ परीसर, छत्रपती शिवाजी विदयापीठ मेनरोड, रंकाळा परीसर, मध्यवर्ती बस स्थानक ते रेल्वे स्टेशन व टेंबलाई मंदीर परिसरात करण्यात आली. या मोहिमेत प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह शाहू समाधी स्थळ, रंकाळा टॉवर व पंचगंगा नदी घाट परिसर या ठिकाणी फिरती करुन स्वयंसेवी संस्था समवेत स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेत २ जेसीबी, २ डंपर, ४ ट्रॅक्टर ट्रॉली व २ पाणी टँकरचा वापर करण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेत उप-आयुक्त रविकांत आडसूळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, नारायण भोसले, बाबूराव दबडे, नगरसचिव सुनिल बिद्रे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, अर्थवारीयर्सचे ललित गांधी व सदस्य, व्हाईट आर्मीचे जवान, थुकीमुक्त कोल्हापूरचे राहूल राजशेखर व सदस्य, वृक्षप्रेमी वेल्फेअरचे अमोल बुड्डे, अक्षय कांबळे व सदस्य, स्वच्छतादूत अमित देशपांडे, क्रिडाई संस्थेचे विद्यानंद बेडेकर व सदस्य, स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगांवकर व सदस्य, शिवाजी विद्यापीठ डिओटीचे प्राध्यापक अमोल कुलकर्णी व विद्यार्थी, शेल्टर असोशिएशनचे सदस्य, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखील पाडळकर, महेश भोसले, नंदकुमार पाटील, सुशांत कावडे, शिवाजी शिंदे, शुभांगी पोवार, करण लाटवडे, मुनीर फरास, मनोज लोट, आरोग्य, पवडी, अतिक्रमण, नगरसचिव, नगररचना, इस्टेट, सामान्य प्रशासन, परवाना, आरोग्य प्रशासन, विद्युत, नगरसचिव विभाग, ब्युरो, वर्कशॉप व अग्निशन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

गुरुवार, दि.५ मे २०२२ रोजी सकाळी ७ वाजता रंकाळा टॉवर ते फुलेवाडी पेट्रोल पंप परिसर, सीपीआर चौक ते व्हिनस कॉर्नर, शाहुमिल चौक ते सायबर चौक, इंदिरा सागर हॉटेल ते कळंबा जेल, डिएसपी चौक ते खानविलकर पेट्रोलपंप, रंकाळा टॉवर ते तांबट कमान, पंचगंगा नदी रोड ते पंचगंगा घाट परिसर, शेंडा पार्क ते सायबर चौक, इंदिरा सागर हॉटेल ते तलवार चौक, व्हिनस कॉर्नर ते मध्यवर्ती बस स्थानक, कावळा नाका ते शिरोली जकात नाका येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *