विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनेश किरवे निर्मित, प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे दिग्दर्शित ” तिरसाट” २० मे रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार.दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्स ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. निरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के हि नवखी जोडी या सिनेमातून पदार्पण करीत आहेत.
प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध प्रेमासाठी करायला लागणारी धडपड अशा कित्येक गोष्टींना दोन प्रेम करणाऱ्यांना सामोरे जावे लागते याची मांडणी “तिरसाट” या चित्रपटातून केली आहे. एक अनोखी प्रेमकहाणी आपल्या भेटली येत आहे.काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं “उधान आलया फर्मान आलया जीवाला जीवाचं अवतान आलया” भन्नाट अस गाणं आणि चित्रपटाचा टिजर लाँच करण्यात आला. गाण्याला आणि टीजर ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
नुकताच आज ट्रेलर लाँच करण्यात आल्याने चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. तेजस्विनी एक महाराष्ट्रीयन मुलगीची भूमिका साकारत आहे तर निरज एक शेतकरी मुलाची भूमिका साकारत आहे.
मुख्य भूमिकेत निरज आणि तेजस्विनी सह चित्रपटात यतीन कार्येकर, ओंकार यादव, पल्लवी घुले, सुजित चौरे, विवेक यादव, आनंद साने, रामदेव जमदाडे, नीलिमा कामने, श्रुती उबाळे यांच्या देखिल महत्वपूर्ण भूमिका आहेत. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिगदर्शन केलं आहे.