वडगांव हायस्कूल १९९९ च्या १०वी बॅच चा स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे

कोल्हापूर/प्रतिनिधी :  डगांव हायस्कूल वडगाव १० वी १९९९ बॅचचा स्नेह संमेलन मिणचे येथील हॉटेल सिल्वर कॅसल येथे आज मोठया उत्साहात पार पडले ५० मित्र मैत्रिणी यावेळी उपस्थित होते 

Advertisements

जुने मित्र मैत्रिणी भेटावे व सर्वांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणीत रमावे यासाठी हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला सर्वांनी आपआपली ओळख करून दिली त्या नंतर निलम पाटील व पत्रकार प्रकाश कांबळे यांनी गीत गाऊन उपस्थिताची मने जिंकली सर्व मित्र मैत्रिणी जुन्या आठवणीने भारावून गेले तू काय करतोस तू सध्या काय करतेस अशी चर्चा रंगली होती सर्वांनी आपण सध्या काय करतो तसेच कुटुंबाबद्दल माहिती दिली यावेळी हणमंत पाटील, अशोक चोगुले, शिवानंद माळकर,संदीप पवार आदी नी मनोगत व्यक्त केले यावेळी सर्वाची फनी गेम्स स्पर्धा समित कोळी यांनी घेतली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नाली कल्याणी यांनी केले तर स्वागत सुनील कोळेकर यांनी केले यावेळी महेश पाटील, उमेश पाटील, सचिन पाटील,जमीर मोमीन, ओंकार पाटोळे, दिवाकर पाटील, युवराज पाटील, प्रल्हाद जाधव, विवेक गुरव, सुशांत शिखरे, मोजेस चोपडे, विजय पाटील, विपुल वडगांवे, अभिजित सुतार, नीलम पाटील,वृषाली जामदार,दीप्ती, क्रांती, आरती, योगिता, कविता, रुपाली, मेघा, सोनल,नेहा खंदारे यांच्या सह अनेक जण उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन स्वप्नाली कल्याणी, सुनील कोळेकर, सचिन पाटील,योगेश भोपळे यांनी केले तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *