क्राईम रिपोर्टर जावेद देवडी
कोल्हापूर/प्रतिनिधी : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे सो यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून काढून त्यांचेकडील हत्यारे व दारूगोळा जप्त करून सदर इसमांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.पोलीस अधीक्षक यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, संजय गोर्ले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथके तयार करून माहिती घेत असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की, आकाश रामचंद्र चांदम, रा. सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर याचेकडे बेकायदेशिर गावठी बनावटीचे पिस्टल असून तो त्याचे कडील गावठी बनावटीची पिस्टल विक्री करणे करीता जुना वाशी रोडलगत असले हॉटेल कडान जवळ येणार आहे. अशा मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस सचिन गुरखे, उत्तम सडोलीकर, सचिन देसाई, वैभव पाटील व दिपक घोरपडे यांनी दि.१८.०५.२०२२ रोजी जावून जुना वाशी रोडलगत असले हॉटेल कडान जवळ सापळा लावून आकाश रामचंद्र चांदम, व. व. २४, रा. सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर यास त्याचे कब्जातील ५०,००० रूपये किंमतीचे गावठी बनावटीचे ०१ पिस्तुल, २०० रूपये किंमतीचा ०१ जिवंत राऊंड असा एकूण ५०,२०० रूपये किंमतीचे मुद्देमालासह पकडले आहे. सदर आरोपीस त्याचे कब्जात मिळाले मुद्देमालासह जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे सो, अपर पोलीस अधीक्षक, तिरूपती काकडे सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, संजय गोर्ले, पोलीस अमंलदार सचिन गुरखे, उत्तम सडोलीकर, सचिन देसाई, वैभव पाटील, दिपक घोरपडे व संजय पडवळ यांनी केली आहे.