Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
राज्यसभेच्या सहा जागापैकी दोन जागावर भाजप सहज जिंकू शकते. यातील एका जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे नाव निश्चित आहे तर दुसऱ्या जागेवर कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव पुढे येत आहे.
एका हॉटेलात पत्रकार परिषद मध्ये कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी धनंजय महाडिक काही दिवसात दिल्लीत दिसतील असे सुतोवाच केले होते.
त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक यांचे नाव पुढे आले आहे. चंद्रकांतदादांनी आग्रह धरल्यास महाडिक हे पुन्हा एकदा खासदार निश्चितपणे होतील.
कोल्हापूरचा विकास साधण्यासाठी धनंजय महाडिक पुन्हा एकदा खासदार व्हावे अशी समर्थकांची इच्छा आहे
Share Now