कोल्हापूर/प्रतिनिधी : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी दहावीचा निकाल ९०.५% लागला आहे. सविस्तर निकाल पुढील प्रमाणे:
चैत्राली अंबुसकर ९८.४०% प्रथम
तय्यबअली रिकिबदार ९६.८०% द्वितीय
ओम पाटील ९६.६४% तृतीय
श्रीया जोके. ९६.१६%
अभिषेक पट्टणशेट्टी ९५.०४% %
इंग्लिश विषयात १२५ पैकी १२५ गुण मिळवून चैत्राली अंबुसकर, हिंदी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून श्रीया जोके तर समाजशास्त्र विषयात तय्यबअली रिकिबदार, ओम पाटील, जान्हवी साळुंखे, देवेंद्र कागे, सुजल गोरवाडे आणि क्षितिज बचाटे या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधील ३२ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत तर ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत.
सर्व विद्यार्थ्यांना प्रिन्सिपॉल दीपाली जोशी, ज्योती हरदी वर्गशिक्षिका वैशाली देशमाने यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. निपाणी भागातून सर्व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.