बेकायदेशीर रित्या हत्यारे बाळगणाऱ्या एकास अटक…

क्राईम रिपोर्टर:जावेद देवडी

कोल्हापूर/प्रतिनिधी: पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेकरीता कोल्हापूर जिल्हयातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून त्यांचेकडील हत्यारे व दारूगोळा जप्त करून सदर इसमांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.पोलीस अधीक्षक यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, संजय गोर्ले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथके तयार करुन माहिती घेत असताना दि. १९.०५.२०२२ रोजी इसम नामे सागर निंगाप्पा पाटील, रा. इनाम सावर्डे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर हा विनापरवाना, बेकायदा गावठी बनावटीची बारा बोअरची बंदूक व त्याकरीता लागणारे काडतूस कब्जात बाळगून त्याचे घराजवळ वावरत असले बाबत पोलीस निरीक्षक, संजय गोर्ले यांना खात्रीशिर गोपनीय बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक, शेष मोरे तसेच पोलीस अमंलदार चंदू नन्नवरे, सुनिल कवळेकर,अजय वाडेकर, तुकाराम राजीगरे व ओंकार परब असे इनाम सावर्डे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथे जावून सागर निंगाप्पा पाटील, व.व.३७, रा. इनाम सावर्डे, पो. हिंडगाव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर यास त्याचे राहते घरासमो त्याचे कब्जातील बारा बोअरची सिंगल बॅरेल ०१ बंदुक व बारा बोअरचे ०१ जिवंत काडतुसासह पकडले आहे. त्याचे कब्जातील मिळालेला सर्व मुद्देमाल जप्त करून मुद्देमालासह त्यास ताब्यात घेवून पुढील कारवाईकरीता चंदगड पोलीस ठाणे येथे रिपोर्टासह हजर केले आहे.

Advertisements

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे सो मा अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे तसेच पोलीस अमंलदार चंदू नन्नवरे,सुनिल कवळेकर, अजय वाडेकर, तुकाराम राजीगरे, ओंकार परब, संदीप कुंभार, वसंत पिंगळे,संतोष पाटील, संजय पडवळ, अनिल जाधव, अजय काळे व रणजीत कांबळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *