कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील बी.व्होक अँड कम्युनिटी कॉलेज विभागामार्फत ‘सोशल मिडिया मार्केटिंग’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन उद्या २२जुलै रोजी सकाळी अकरा वाजता विवेकानंद कॉलेज मध्ये करण्यात आले आहे. यावेळी मुंबई येथील इमेज ऑनलाईनचे संचालक मनोज कोटक प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
मुंबईतील पहिल्या पिढीतील नेट एक्स्पर्ट म्हणून मनोज कोटक ओळखले जातात. बदलत्या बाजारपेठांच्या गरजा आणि त्या ओळखून दिलेल्या रास्त सेवा यामुळे समाधानी असलेले असंख्य ग्राहक यामुळे त्यांची कंपनी आयटी इंडस्ट्रीमध्ये एक नावाजलेली आणि अग्रणी म्हणून गणली जाते.तसेच कोटक हे सक्रिय उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीबीएस, वेब डिझायनिंग, ई-कॉमर्स, सॉफ्टवेअर कम्प्लायन्स, ओपन-सोर्स, सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, वेब टू प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि ऑनलाइन प्रिंटिंगवर असंख्य लेख वेगवेगळ्या प्रकाशनांनमधून आणि अग्रगण्य आयटी फोरम मधून लिहिले आहेत.
कोटक यांनी भारतीय शिष्टमंडळातून अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप, आशियाई देश आणि सौदी अशा पंधरा देशांमध्ये भारतीय आयटी इंडस्ट्रीचे प्रतिनिधीत्व केले आहे. यामध्ये भारतातील सर्वात मोठय़ा दोनशे दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची निर्यात असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी व्यापार संस्थेचा समावेश आहे.
आजपर्यंत आयटी आणि डिजिटल मार्केटिंग यासंदर्भात त्यांनी हजारो लोकांना मार्गदर्शन केले आहे. “ज्ञान दिल्याने यश मिळते” हा त्यांचा मूलमंत्र आहे.
सदर चर्चासत्र सर्वांसाठी नि:शुल्क असून इच्छुकांनी चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे समन्वयक प्रा. सतीश गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.वाय.होनगेकर यांनी केले आहे.
‘सोशल मिडिया मार्केटिंग’ या विषयावर विवेकानंदमध्ये चर्चासत्राचे आयोजन
Read Time:2 Minute, 47 Second