Media Control Online
भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर,संजय पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महाविकास आघाडीला अपेक्षित असलेल्या १० आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीची ९ ते १० मतं मिळवण्यात यश आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आलं आहे. भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर,संजय पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मतं मिळाली होती. तर, धनंजय महाडिक यांना २७ मतं मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.
पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८ मतं मिळाली. तर, शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांना ४३ तर काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना ४४ मतं मिळाली आहेत.