Share Now
कोल्हापूर/प्रतिनिधी : नूतन खासदार धनंजय महाडिक यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांची मिरवणूक व्हिनस कॉर्नर परिसर मध्ये आल्या नंतर युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या मुख्य कार्यालय परिसर मध्ये फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रचंड गर्दी असताना देखील नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक व स्वीय सहाय्यक दत्ता आवळे आमच्याकडे पाहत हात उंचावून इशारा करत लक्ष वेधले.
यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, सामाजिक कार्यकर्ते मुनाफ बेपारी,रमेश मोरबाळे, राज्य सरचिटणीस अजय शिंगे, संघटक दत्तात्रय कोंडेकर, प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव वळवडे, प्रसिद्धीप्रमुख रोहित वज्रमट्टी, गौरव यादव, अयाज चाऊस,ऋषिकेश पोवार,लक्ष्मण शिंगे, यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.
Share Now