नूतन खासदार धनंजय महाडीक यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत…!

कोल्हापूर प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे रविवारी कोल्हापूर मध्ये आगमन झाल्यानंतर.नूतन खासदार धनंजय महाडिक यांची समर्थकांच्या वतीने कोल्हापुरात जल्लोषी स्वागत ,नूतन खासदार यांनी घेतले करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन. कोल्हापूर जिल्ह्याचे विकास कामाबद्दल घातले साकडे. भाजपचे मानले आभार आणि युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचे स्वागत आतिषबाजीने केले. समर्थकांची उत्साह पाहून महाडिक कुटुंबीय झाले थक्क 

राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची आज कोल्हापुरात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. ताराराणी चौकात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत, वाद्यांच्या ठेक्यावर भाजपच्या कार्यकत्यार्र्ंनी जल्लोष केला. तब्बल १२०० किलो वजनाचा ४० फुटांचा फुलांचा हार क्रेनद्वारे खासदार महाडिक आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना घालण्यात आला. मशिनद्वारे होणारी गुलालाची उधळण, वाद्यांचा गजर आणि समर्थकांच्या प्रचंड उत्साहात विजयी मिरवणूक निघाली. स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक मार्गे मिरवणूक अंबाबाई मंदिरा पर्यंत पोहोचली. अंबाबाईच्या दर्शनानंतर विजयी मिरवणुकीची सांगता झाली.  

राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचं आज कोल्हापुरात आगमन झालं. भाजप आणि महाडिक गटाच्या वतीनं खासदार महाडिक आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. ताराराणी चौकात तब्बल १२०० किलो वजनाचा ४० फूटाचा हार क्रेनवर सज्ज होता. गुलालाची उधळण करण्यासाठी खास मशिन मागवण्यात आलं होतं. तर कार्यकर्त्यांनी जेसीबीद्वारेही गुलालाची उधळण करत विजयाचा आनंद साजरा केला. सायंकाळी पाचच्या सुमारास खासदार महाडिक आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ताराराणी चौकात दाखल झाले. त्यांनी करवीर संस्थापिका तारारणींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर खासदार महाडिक, प्रदेशाध्यक्ष पाटील आणि आमदार प्रकाश आवाडे यांना क्रेनद्वारे १२०० किलो वजनाचा हार घालण्यात आला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात मिरवणुकीला सुरुवात झाली. खासदार महाडिक यांनी शड्डू ठोकत उपस्थितांचा उत्साह वाढवला. दाभोळकर कॉर्नर, स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक मार्गे मिरवणूक बिंदू चौकात पोहोचली. दरम्यान, बी न्यूज कॉर्नरला भीमा रिद्धी इन्फोटेक आणि बी न्यूजच्या टीमनं खासदार महाडिक यांचं स्वागत केलं. बिंदू चौकातून मिरवणूक शिवाजी चौकमार्गे अंबाबाई मंदिरात पोहोचली.

खासदार महाडिक, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमदार प्रकाश आवाडे, पृथ्वीराज महाडिक, विश्‍वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, समरजीतसिंह घाटगे, राहूल चिकोडे, महेश जाधव यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर विजयी मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीनंतर खासदार महाडिक यांनी ताराराणी चौकातील कार्यालयात शुभेच्छा स्वीकारल्या. विजयी मिरवणुकीसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सुनील कदम, सत्यजीत कदम, स्वरुप महाडिक, प्रा. जयंत पाटील, महेश जाधव, विजय जाधव, सुहास लटोरे, राहुल आवाडे, किरण नकाते, संग्राम निकम, संजय निकम, मुरलीधर जाधव, महेश वासुदेव, संगीता खाडे, बंडा साळोखे, महेश उरसाल, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, आशीष ढवळे, नीलेश देसाई, भूषण पाटील यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी, धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते, विश्‍वहिंदू एकता आंदोलन, हिंदू एकता संघटना, पतीत पावन संघटना, बजरंग दल, भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *