नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे रविवारी कोल्हापूर मध्ये होणार जल्लोषी स्वागत….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :राज्यसभेच्या निवडणूकीत विजय मिळवलेले खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे रविवारी कोल्हापुरात आगमन होत आहे. सायंकाळी ४ वाजता ताराराणी चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर शहरातून बाईक रॅलीद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. धनंजय महाडिक यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ते कावळा नाका इथल्या कार्यालयात शुभेच्छा स्विकारणार आहेत. त्यासाठी जिल्हयातील महाडिक प्रेमी कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी ४ वाजता ताराराणी चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाडिक कुटूंबिय आणि भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यसभेच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणूकीत बाजी मारत धनंजय महाडिक विजयी झाले. त्यानंतर ते रविवारी सायंकाळी ४ वाजता कोल्हापुरात येणार आहेत. खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचं ४ वाजता ताराराणी चौकात जल्लोषी स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर शहरातून बाईक रॅलीद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. व्हीनस कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक या मार्गावरून ही मिरवणूक जाणार आहे. दसरा चौकातील राजर्षि शाहूंचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर, खासदार महाडिक श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर कावळा नाका इथल्या कार्यालयात खासदार महाडिक शुभेच्छा स्विकारणार आहेत. खासदार महाडिक यांचे ताराराणी चौकात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यासाठी आणि बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हयातील महाडिक प्रेमी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रविवारी ४ वाजता ताराराणी पुतळ्याजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन महाडिक कुटूंबिय आणि भाजपच्या वतीने करण्यात आले आहे 

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *