भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला शब्द पाळला : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणूकीत विजयी झालेले खासदार धनंजय महाडिक यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार केला. आपल्याला खासदार करून दादांनी दिलेला शब्द पाळला आहे, असे प्रतिपादन यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजलीताई पाटील यांनी भेट दिली. खासदार धनंजय महाडिक यांनी, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा, तर सौ. अरूंधती महाडिक यांनी, सौ. अंजलीताई पाटील यांचा सत्कार केला. येत्या काही दिवसात धनंजय महाडिक दिल्लीत दिसतील, असा शब्द चंद्रकांतदादांनी दिला होता. तो शब्द पाळल्याची कृतज्ञतापूर्ण भावना धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. पुढील कारकिर्दीसाठी चंद्रकांतदादांनी खासदार महाडिक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंगलताई महाडिक उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *