शाहूपुरी पोलिस ठाण्याचे धडक कामगिरी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कडून कौतुक…

पाच लाख रु किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणारे महिलेस
शिताफीने केले अटक
कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहूपूरी पोलीस ठाणे, कोल्हापूर
महिला अंजना लक्ष्मण साळवी रा. कुर्ली ता. निपाणी जि.बेळगाव हया त्यांचे पती (सेवानिवृत्त
शिक्षक) यांचे सोबत चिपळुन येथे आपल्या मुलाकडे राहणेस गेल्या होत्या. चिपळुन वरुन फिर्यादी महिला व त्यांचे
पती परत गावी जाणेसाठी दिनांक ११/०६/२०२२ रोजी मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथे आले. मध्यवर्ती बस
स्थानक कोल्हापूर येथुन गावी जाणे करीता गडहिंग्लज बस मध्ये बसुन कावळा नाका (ताराराणी चौक) येथे आले
त्यावेळी बस कावळा नाका चौक येथे बंद पडली. त्यामुळे तक्रारदार महिला व त्यांचे पती कावळा नाका येथे थोडा
वेळ थांबुन दुसरे बसने कागलकडे जाणेसाठी बस मध्ये चढत असताना त्यांचे बॅग मधील १० तोळे सोन्याचे दागिने असलेली लहान पर्स
ही दुपारी २.४० वाचे सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी करुन नेले बाबत यातील
तक्रारदार महिला यांनी दिनांक ११/०६/२०२२ रोजी शाहुपूरी पोलीस ठाणसे तक्रार दिलेने शाहुपूरी पोलीस ठाणेस
गुरनं ४५७/२०२२ भादंविस कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयांचे गांभिर्य पाहुन शैलेश बलकवडे, पोलीस अधिक्षक कोल्हापूर, यांनी सदर गुन्हयाचा
तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या. सदर गुन्हयाचा तपास मा. उपविभागीय
पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे यांचे मागदर्शनाखाली शाहुपूरी पोलीस ठाणेचे सहा.
पोलीस निरीक्षक श्री. श्रीकांत इंगवले व गुन्हे शोध पथक हे करत होते. सदर गुन्हा दाखल झालेनंतर तात्काळ
घटनास्थळी गुन्हे शोधपथकाने भेट देवून सदर गुन्हयाचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकास त्यांचे गोपणीय
बातमीदार यांचेकडुन बातमी मिळाली की, सदरची चोरी ही इंदीरानगर झोपडपटटी, सांगली येथील महिलेने केली
असल्याची खात्रिशिर बातमी मिळाली. त्या प्रमाणे गुन्हे शोध पथकाने सांगली येथे जाऊन तपास केला असता सदरची
महिला ही सांगली येथुन गेले १० दिवसापासुन बाहेर गावी राहणेस गेली असत्याची माहिती मिळुन आली.
गुन्हे शोध पथक हे सांगली येथुन परत येत असताना त्यांना पुन्हा त्यांचे बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली की, सदरची
महिला ही हातकणंगले येथे असल्याची माहिती मिळालेने सदर ठिकाणी जाऊन महिलेचा शोध घेतला असता सदरची
महिला ही हातकणंगले येथे मिळुन आली. तिचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता तिने प्रथम
उडवाउडवीची उत्तेरे दिली. परंतु तिचेकडे अधिक चौकशी केली असता तिने गुन्हयाची कबुली देवुन आपले नांव
सविता उर्फ पपी केरु चौगले वय २८ रा. इंदीरानगर झोपडपटटी, गारपिर चौक, सांगली सध्या रा. हातकणंगले असे
असुन सदरचे दागिने हजर केले ते दोन पंचासमक्ष जप्त केले आहे.
१० तोळे वजनाचे व सुमारे ५ लाख रु किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.

| सोन्याचे दागिण्याचे वर्णन खालील प्रमाणे
तीन तोळे वजनाचा सोन्याचा हार,
सोन्याचे चार बिल्वर चार तोळे वजनाचे,
सोन्याचे कानातील वेल व कुडया सुमारे एक तोळे वजनाचा,
सोन्याचे स्टॉप जोड एक सुमारे ९ ग्रॅम वजनाचा,
सोन्याचे अंगठया सुमारे एक तोळे वजनाच्या,
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक कोल्हापूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक कोल्हापूर,
मंगेश चव्हाण उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस व
निरीक्षक ईश्वर ओमासे यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपुरी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख श्रीकांत
इंगवले सहा. पोलीस निरीक्षक, महिला पोसई श्वेता पाटील, पोहेकॉ ऋषीकेश पवार, पो ना युवराज पाटील, मिलिंद
बांगर, पोकों शुभम संकपाळ, लखन पाटील, सागर माने, मपोकों शिल्पा आडके यांनी केली आहे.

आव्हानात्मक वस्तुस्थिती असताना देखील शाहूपुरी पोलिस ठाण्याचे तपास पथकाचे त्यांच्या कामगिरीबद्दल, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *