Kolhapur : युवा पत्रकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजीराव शिंगे यांचा गौरव

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 37 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – विश्व संवाद केंद्र आणि लोक ऊत्कर्ष समितीच्या वतीने नारद जंयतीनिमित्त पत्रकार सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी वक्ते सुहास लिमये आणि रा.स्व.संघाचे विभागीय सदस्य मुंकुंद भावे यांचे हस्ते युवा पत्रकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजीराव शिंगे आणि जिल्हा पत्रकार संघटनेचे संस्थापक सुधाकर निर्मळे यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर, विविध दैनिके प्रसिद्ध माध्यम – वृत्तवाहिन्याच्या पत्रकार – प्रतिनिधी यांचाही सत्कार करण्यात आला.

यामध्ये शुभांगी तावरे,अक्षय थोरवत, राजेंद्र मकोठे, श्रद्धा जोगळेकर,सलीम सोलापुरे,सदाशिव जाधव,,बाबासाहेब खाडे, निखिल गोखले, ओंकार धर्मधिकारी, प्रमोद व्हानगुत्ते, शैलेश माने,प्रशांत आयरेकर,मालोजी केरकर,कमलाकर सारंग यांना पुस्तक संच देऊन गौरविण्यात आले.

करवीर नगर वाचन मंदिर येथे हा गौरव सोहळा पार पडला. ‘स्वामी विवेकानंदाचे राष्ट्र निर्माणातील योगदान’ या विषयावर अभ्यासक सुहास लिमये यांनी आपले हितगुजपर मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुहास लिमये म्हणाले, समाजात भुकेल्या पोटी प्रवचन पचनी पडत नाही.तर, या दरिद्री नारायणाच्या सेवेतच धर्म-जीवनाचे मुलभूत तत्वज्ञान सामावले आहे,अशी अवघ्या जगाला भारावून टाकणारी नवी कृतीशील सहज कर्मयोगाची दृष्टी स्वामी विवेकानंदानी दिली. आपल्या भाषणात सुहास लिमये यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील देश-विदेशातील विविध महत्त्वाचे प्रसंग नमूद करत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली विज्ञाननिष्ठा कधीच सोडली नाही. उलट भारतीय वेंदान्तामधूनच जगाला अंतिम सत्य समजेल हे ठामपणे सांगत सेवाभावातील कर्मयोग ही विज्ञाननिष्ठपणे पटवून दिला.

यावेळी स्वागत समन्वयक अनिरुध्द कोल्हापूरे यांनी केले. मुख्य वक्ते व पाहुण्याचा परिचय सूत्रसंचालन डॉ.सदानंद राजवर्धन यांनी करुन दिला.

या सोहळ्यास डॉ. विक्रम राजाज्ञा, र्कीतीराज देसाई ,आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ पंच भारत चौगुले – ऊत्कर्ष लोमटे, सुलोचना नार्वैकर, सुनील पंडीत, तेजस्वीनी हराळे, रविसागर हाळवणकर, जावेद देवडी, रविराज कोल्हटकर, केदार जोशी, वृंदा सावेकर, तेजास्विनी गायकवाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *