Share Now
Read Time:1 Minute, 7 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (रतन हुलस्वार/प्रतिनिधी) – अखिल भारतीय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झंकार ऑर्केस्ट्राचे मालक मुकुंद सुतार आणि झंकार ऊर्फ भालचंद्र सुतार यांना जिवे मारण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी नृत्य व अभिनय कलाकार नयन कांबळे आणि रणजीत चव्हाण या दोघांच्यावर कडक कार्यवाही करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले.
यावेळी झंकार कलामंच कलापथक निर्माता असोसीएशन, रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडी सांगली,कलापथक, कलाकार संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कलाकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Share Now