Kolhapur : राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 43 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील निवासस्थानासह साखर कारखाना तसेच त्यांच्या पुण्यातील मुलाचे घर आणि कोल्हापुरातील टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्याही घरावर आयकर विभागाचा छापा टाकला. कोल्हापूरातील मुश्रीफ यांच्या घरासमोर हजारोंचा जनसमुदाय भाजप विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कागल, कोल्हापुर, मुंबई,पुण्यासह राज्यभरात 16 ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी टाकण्यात आल्या आहेत.आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर कार्यालयावर टाकलेल्या धाडीत लाखो लोकांना मोफत उपचारासाठी दिलेल्या पत्रांचे गठ्ठे सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. त्यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी गर्दी केली. या कारवाईनंतर एका वृद्धेला अश्रू आवरता आले नाहीत.

जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे बडे नेते समजल्या जाणाऱ्या केडीसीसीचे अध्यक्ष तथा आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी आज पहाटे आयकर विभागाची टीम दाखल झाली. तर, त्यांच्या साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. याचबरोबर, आमदार हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील मुलाच्या घरासह टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्या ही घरावर आयकर विभागाचा छापा टाकला आहे.

मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे आमदार मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असल्याचे समजत आहे.

दरम्यान, पालकमंत्री तथा भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आमदार हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याच जाहीर निमंत्रण दिले होते. मात्र, आमदार मुश्रीफ यांच्याकडून आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.तर अचानक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने आमदार मुश्रीफ यांच्या घरासह कारखान्यावंर टाकलेल्या धाडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून नेमके कारण अजून गुलदस्त्यात आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *