चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर शाखेचे शानदार उद्घाटन संपन्न* कोल्हापूरकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (मुबारक आतार) : महालक्ष्मीच्या शुभशीर्वादाने पावन झालेल्या व पंचगंगेच्या पाण्याने सुजलाम-सुफलाम असलेल्या करवीर नगरीमध्ये गेली 192 वर्ष शुद्धता परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभा राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या   (बारामतीचे शुद्ध सोने) हीच ज्यांची ओळख आहे त्या प्रख्यात चंदूकाका सराफ आणि सन्स प्रा. लि. च्या सेंड करून भव्यदिव्य 18 व्‍या कोल्हापूर सुवर्ण दालनाचा शुभारंभ गुरुवार दि. 25 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वाजता प्रख्यात उद्योजक संजय घोडावत यांच्या शुभहस्ते दीपप्रज्‍वलन करून करन्‍यात आले  कोल्हापूरच्या महापौर माधवी गवंडी, माजी महापौर हसीना फरास, ऋतुराज पाटील,चंदुकाका सराफ अँड सन्स चे संचालक किशोरकुमार जिनदत्त शहा, अतुलकुमार जीन दत्त शहा, सिद्धार्थ अतुलकुमार शहा, सौ संगीता अतुलकुमार शहा, सौ नेहा किशोरकुमार शहा, सौ अंकिता सिद्धार्थ शहा,सम्‍यक किशोरकुमार शहा व अन्य मान्यवर यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी बोलताना संजय घोडावत यांनी चंदूकाका सराफ यांचे भव्य दिव्य शोरूम पाहून कोल्हापूरकरांना साजेसे असे सुवर्ण दालन चंदुकाका यांनी साकारले असून पिढ्यांन पिढ्यांनी कमावलेला विश्वास व सचोटी यामुळे संपूर्ण राज्यभर नावलौकिक असल्याचे श्री घोडावत यांनी गौरवोद्गार काढले तर यावेळी बोलताना किशोर भाई शहा मॅनेजिंग डायरेक्टर चंदुकाका सराफ यांनी समृद्धता ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहरात सुरू होणारी ही 18 शाखा असल्याचे सांगितले. आमच्या सराफ पिढीने गोल्ड योजनेत 28 जुलै पर्यंत सहभागी होणाऱ्या एका भाग्यवान विजेत्याला एक ज्युपिटर स्कूटर मिळविण्याची सुवर्णसंधी ही उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *