Share Now
Read Time:1 Minute, 7 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील चालू वर्षाचा मिळकत कर एक रकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना गुरुवार, दि.३० जून २०२२ अखेर ६ टक्के सवलत दिली जाते. या सवलत योजनेस नागरीकांनी प्रतीसाद देत १९२१६ करदात्यांनी एकूण रु.९ कोटी ५८ लाख २५ हजार २५४ इतका कर गुरुवार अखेर भरणा केलेला आहे. गुरुवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६५५ करदात्यांनी रुपये ८७ लाख ५० हजार २९५ इतका कराचा भरणा केलेला आहे. ३० जून नंतर १ जुलै ते ३० सप्टेंबर अखेर करदात्यांना ४ टक्के सवलत दिली जाणार आहे. तर १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०२२ अखेर २ टक्के सवलत दिली जाणार आहे. तरी ६ टक्के सलवत योजनेचा जास्तीत जास्त करदात्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
Share Now