कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१५ : राजर्षी शाहु छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या मार्फत दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आला असुन यावर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि सहित्यक मा. डॉ. जनार्दन वाघमारे यांना जाहीर झाला आहे. १९८४ पासुन समजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना राजर्षी शाहू पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. आतापर्यंत ३३ लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.त्यापैकी काही नावे पुढीप्रमाणे-
भाई माधवराव बागल, क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर, श्री. व्ही. शांताराम, डॉ. बाबा आढाव, रँगलर जयंत नारळीकर, श्रीमती आशा भोसले, प्रा. एन. डी. पाटील, श्री. शरद पवार, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, श्री. राजेंद्रसिंह, श्री. आण्णा हजारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.सन २०२० चा राजर्षी शाहु पुरस्कार मा. डॉ. तात्यावर लहाने यांना जाहीर करणेत आला होता. कोरोना निर्बंधांमुळे त्यांना प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान करणेत आला नव्हता.त्यामुळे त्यांनाही पुरस्कार यावर्षी प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. जनार्दन वाघमारे यांचा थोडक्यात परिचय-
डॉ. जनार्दन वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी लातूर जिल्ह्यातील कौठा या गावात झाला.त्यांचे शिक्षण एम ए (इंग्रजी) मधून पूर्ण केले तसेच इंग्रजी विषयाचे व्याख्याते म्हणून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली. मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून निग्रो साहित्यावर PHD घेतली आहे.१९७७ साली लातूरच्या राजर्षी शाहु महाविद्यालयाचे प्राचार्य झालेनंतर गुणवत्ता वाढीचा “लातूर पॅटर्न” महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे.२००१ साली त्यांची लातूर च्या नगराध्यक्ष पदी निवड झाली.२००८ ते २०१४ या कालावधीत राज्यसभेचे सदस्य असताना त्यांनी संयुक्त राष्ट्रात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य राहिले आहेत.आतापर्यंत त्यांनी विवीध विषयांवर एकुण ४७ पुस्तके लीहली आहेत. त्यांना पंजाबी विद्यापठाची “डि. लीट” हि मानद पदवी प्राप्त झाली आहे.आजपर्यंत त्यांना अनेक सामजिक पुरस्कार मिळाले आहेत.
त्यापैकी फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार इत्यादी.वरील पुरस्कार सोहळा राजर्षी शाहु महाराजांच्या जयंती दिवशी २६ जून २०२२ रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.