आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शहरात दैनंदिन निर्माण होणारा कचरा उठाव, गटर्स व नाले स्वच्छता, पडलेल्या झाडांचे कटींगसाठी नागरीकांच्या तक्रारीसाठी वॉर रुम

कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरात आपत्ती व्यवस्थापनेअंतर्गत पूर परिस्थितीच्या काळात शहरात दैनंदिन निर्माण होणारा कचरा संकलन, कचरा उठाव, गटर्स व नाले स्वच्छता, वादळ/पावसामुळे पडलेल्या झाडांचे कटींग करणे, औषध व धूर फवारणी, पालापाचोळा तातडीने उठाव करणे गरजेचे आहे. यासाठी शहरातील नागरीकांच्या तक्रारी स्वीकारणेसाठी व त्या विहित मुदतीत निर्गत करणेसाठी महापालिकेच्या मुख्य इमारत स्थायी समिती सभागृहामध्ये वॉर रूम सुरू करण्यात येत आहे. हा वॉर रुम सोमवार, दि.२० जून२०२२ पासून कार्यान्वीत करण्यात येत आहे. पावसाळयामध्ये नागरिकांनी वॉर रूममधील०२३१-२५४२६०१,२५४५४७३ या दोन फोन नंबर्सवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. या वॉर रुममध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६या कार्यालयीन वेळेत तक्रारी स्विकारल्या जाणार आहेत. शासकीय सुट्टीदिवशी नागरीकांनी ९७६६५३२०३७या नंबरवर व्हॉटस्ॲपद्वारे आपल्या तक्रारी नोंद करणेच्या आहेत. या वॉर रूमचे कामकाज ऑगस्ट २०२२ अखेरपर्यंत सुरु राहणार आहे.

             वॉर रुममध्ये फोनद्वारे तक्रारीचे आलेनंतर तक्रारीचे स्वरूप, तक्रारदार, त्याचा पत्ता, मोबाईल नंबर, प्रभागाचे नांव नोंद करुन संबंधीत आरोग्य निरीक्षक यांचेकडे तक्रार वर्ग केल्या जाणार आहेत. या तक्रारी संबंधीत आरोग्य निरिक्षक यांनी विहित मुदतीत पुर्ण करुन तक्रारीचे निराकरण झाल्यावर पूर्वी व नंतरचे (Before & After) फोटोसह तक्रारदार यांना कळविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *