Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – मागील काही दिवसापासून धरण क्षेत्र, डोंगरभागसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरण फुल्ल भरल्याने अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे ओसंडून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात भर पडल्याने नदी पात्राबाहेर जाऊन वाहू लागल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेच इशारा देण्यात आला होता. मात्र,नदीपात्रात अधिक प्रमाणात पाण्याची भर पडत असल्याने नदीला पूर आला. अन् काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे रूपांतर महापुरात झाले. याचे काही फोटोस सोशल मीडियाद्वारे मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क टीमकडे आले आहेत. याच संकलित फोटोच्या माध्यमातून जाणून घेऊ महापुराची भयानकता…
Share Now