Mumbai : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे, त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. यातील बऱ्याच रेल्वे गाड्या ह्या गुरुवारपासून (दि.8) पासून ते रविवारपर्यंत (दि. 11) रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

सेवा विस्कळीत झालेल्या रेल्वेगाड्या – मुंबई-पुणे मागार्वरील रद्द रेल्वे गाड्या :

Advertisements

पुणे – मुंबई 11010/11009) सिंहगड एक्सप्रेस रविवारपर्यंत (दि. 11) रद्द केली आहे.
पुणे – मुंबई (12124/12123) डेक्कन क्वीन एक्सप्रेस रविवारपर्यंत (दि. 11) रद्द केली आहे.
पुणे – मुंबई (12127/12128) इंटरसिटी एक्सप्रेस रविवारपर्यंत (दि. 11) रद्द केली आहे.
पुणे – मुंबई (22106 /22105) इंद्रायणी एक्सप्रेस रविवारपर्यंत (दि. 11) रद्द केली आहे.

याचबरोबर, कोल्हापूर-मुंबई मागार्वरील रेल्वे गाड्या :
कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर (11023/11024) सह्याद्री एक्सप्रेस रविवारपर्यंत (दि. 11) रद्द केली आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावरील (17412) महालक्ष्मी एक्सप्रेस रविवारपर्यंत (दि. 11) रद्द केली आहे.
मुंबई-कोल्हापूर मार्गावरील (17411) महालक्ष्मी एक्सप्रेस रविवारपर्यंत (दि. 12) रद्द केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *