Weather Updates : सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात सर्वात जास्त ३३.३ मि.मी. पावसाची नोंद…!

 विशेष वृत्त कौतुक नागवेकर 

सांगली/प्रतिनिधी दि,०६ : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७.२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३३.३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

   जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ६.४ (९४.८), जत ०.६ (९५.८), खानापूर-विटा २.४ (८८.७), वाळवा-इस्लामपूर ११.३ (९०.९), तासगाव ३ (७४.९), शिराळा ३३.३ (२२८.८), आटपाडी ०.३ (६८.४), कवठेमहांकाळ १.५ (८०.८), पलूस ३.१ (५४.१), कडेगाव ३.९ (७४.१).

 

जिल्ह्यातील वारणा धरणात १२.७४ टी.एम.सी. पाणीसाठा

जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत १२.४७ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४०  टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

  विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना १७.८३ (१०५.२५), धोम  ४.१८ (१३.५०), कन्हेर २.४२ (१०.१०), वारणा १२.४७ (३४.४०), दूधगंगा ७.७६ (२५.४०), राधानगरी २.९८ (८.३६), तुळशी १.५० (३.४७), कासारी १.२१ (२.७७), पाटगांव १.५० (३.७२), धोम बलकवडी ०.९२ ४.०८), उरमोडी ४.१४ (९.९७), तारळी २.११(५.८५), अलमट्टी  ५३.७० (१२३).

विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम  निरंक, कण्हेर  निरंक, वारणा ६४६ दुधगंगा ७०० राधानगरी १२००, तुळशी ५०, कासारी २५०, पाटगांव  निरंक, धोम बलकवडी  निरंक, उरमोडी – निरंकतारळी  निरंक व अलमट्टी धरणातून  निरंक क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

  विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी  व  कंसात इशारा पातळी  फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा  पूल  कराड १४.७ (४५), आयर्विन पूल सांगली ५.९ (४०) व अंकली पूल हरिपूर ९.११ (४५.११)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *