मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरातील अडकलेल्या नागरिकांना सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिधी, नगरसेवक राहुल चव्हाण यांनी कोणतीही प्रशासनाची मदत न घेता स्वतःच्या माणुकीच्या भावनेतून लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित्या केले आहे. तसेच त्यांना अन्न, वस्त्र, निवारासह पाणी आणि औषधे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या सामाजिक कार्याला सलाम केला जात आहे. तसेच स्थलांतरित्या नागरिकांनीही नगरसेवक राहुल चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

यामध्ये जमना वज्रमट्टे, रोहित वज्रमट्टे, पूजा वज्रमट्टे, शिवाजी शिंगे, कोमल शिंगे, स्नेहा शिंगे, गंगुबाई वर्मा, महेश वर्मा, रेखा वर्मा, संजय शिंगे, शुभांगी शिंगे, राहुल शिंगे, गीता करंबळे, मंगेश करंबळे, सुशांत पोवार, प्रभूदास हरिभाऊ शिंदे, मनोहर दिवेकर, मंगल चौगले, सुनीता वेसनेकर, अनिल सावंत, दत्तात्रय लाड, रुक्मिणी कबनुरे, रोहित शहा, मकरंद निगुरकर, अमर सरनाईक, गुरुनाथ कुष्टे, अनंत कुलकर्णी, विक्रम चव्हाण, श्रीमती शाम शहा, सुप्रिया गायकवाड, वैभव दिवेकर आदी पूरग्रस्त नागरिकांचा समावेश आहे.

नगरसेवक राहुल चव्हाण, नाईकनवरे आणि सामाजिक कार्यकाते रियाज सुभेदार यांनी पूरपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून पूरग्रस्त नागरिकांचे शाहूपुरी, कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर, सुतार मळा, नंदनवन पार्क या ठिकाणी स्थलांतर केले. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला.

तसेच त्यांनी आपल्या भागातील लोकांना मदत कार्य करून त्यांना पूरग्रस्तांना दिलासा दिला. तसेच त्यांनी पुरग्रस्तांची व्यवस्था करून निःसंकोचपणे अडचण सांगण्यास सांगितली. तसेच घराची आणि व्यवसायाची कोणतीही काळजी करू नका. आलेल्या परिस्थितीची आणि तब्बेतीची काळजी घ्या, अशा शब्दांत पूरग्रस्तांना आधार दिला.

कोल्हापूरला यंदा महापूर आला आहे. अतिवृष्टी आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंचगंगा नदी पात्र सोडून ओसंडून वाहू लागली. याचवेळी मुसळधार पावसामुळे नाले, ओढे यांनाही तुडुंब प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे नाले, ओढे तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच इशारा देण्यात आला होता. मात्र, नदीचे पाणी पात्राबाहेर अधिक प्रमाणात पसरल्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली.

कागदपत्रे पाण्यात वाहून गेल्यावर आम्हाला मदत कशी मिळणार?
यावेळी पूरग्रस्त नागरिकांना विचारले असता पूरग्रस्त म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक राहुल चव्हाण यांच्याकडून प्राथमिक स्वरूपात आम्हाला मदत मिळाल्याने तेवढाच आधार मिळाला आहे. पण, प्रशासनाकडून आमची अद्यापही पुरग्रस्तांची नागरिक म्हणून दखल घेतली नाही. लोकांकडून प्राथमिक स्वरूपात जी मदत त्यांनी तुटपुंजी आहे. यातून कोणत्याहीप्रकारे झालेले नुकसान भरून काढणे मुश्किल आहे. आमची ओळखपत्रे आणि कागदपत्रे पुराच्या पाण्यात अडकल्याने शासनाची मदत मिळण्यास अडचण येणार आहेत, असे नागरिकांनी सांगितले आहे.