Pune : ‘झोमॅटो गोल्ड’मुळे पुण्यातील काही हॉटेल अँड बार व्यवसायिक डबघाईला

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 40 Second

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – ‘झोमॅटो गोल्ड’च्या ऑनलाइन सेवेतून ग्राहकांना सवलती देणे परवडत नाही.त्यामुळे पुण्यातील सुमारे ४५० हॉटेल अँड बार व्यवसायिकांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘झोमॅटो गोल्ड’च्या ऑनलाइन सेवेतून लॉगऑऊट होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुण्यातील सुमारे १५ हॉटेल बंद पडली असून हि संख्या वाढणार आहे, अशी माहिती पुणे रेस्टोरंट अँड हॉटेलेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.

‘झोमॅटो गोल्ड’ने ग्राहक वाढविण्याच्या प्रयत्नात भरपूर सवलती दिल्या. मात्र, ह्या सवलती हॉटेल हॉटेल अँड बार व्यवसायिकांना देणे परवडेनासे झाले. ‘झोमॅटो गोल्ड’चा वापर करणाऱया हॉटेलमध्ये या ऍपद्वारे जे ग्राहक जेवणासोबत आणि ड्रिंक्स घेतील त्यांच्यासाठी पन्नास टक्के (फिफ्टी परसेंट) सवलत देऊ केली. मात्र, लोक जेवण एका हॉटेलमधून तर, ड्रिंक्स एका हॉटेलमधून घेत होते. त्यामुळे यावर पन्नास टक्के (फिफ्टी परसेंट) सवलत देणे संबंधित हॉटेल चालकांना परवडेनासे झाले. यामुळे अनेक हॉटेल चालकांना नुकसान सोसावे लागले.

याबाबत काही हॉटेल चालकांनी ‘झोमॅटो गोल्ड’शी चर्चा केली मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुण्यातील सुमारे सुमारे ४५० हॉटेल अँड बार व्यवसायिकांनी ‘झोमॅटो गोल्ड’ या ऑनलाइन सेवेतून लॉगऑऊट केले.

‘झोमॅटो गोल्ड’सारख्या सेवांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या अटी-नियमांनुसार काम करणे शक्य नाही, असे पुणे रेस्तराँ अँड हॉटेलिअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *