अमरनाथ येथे भाविक अडकले असल्यास नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर

सांगली/प्रतिनिधी दि.०९  : काश्मीर मधील अमरनाथ येथे शुक्रवारी मोठी ढग फुटी झाली असून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी काश्मीर येथे एन.डी.आर.एफ ०११२३४३८२५२/०११-२३४३८२५३,काश्मीर विभाग ०१९४-२४९६२४० हे हेल्पलाईन स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातील भाविक अमरनाथ येथील ढगफुटी दुर्घटनेत अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या ०२३३-२६००५०० व टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *