५५ हजार कर्जासाठी साडेतीन लाख रुपये वसूल सावकारावर गुन्हा दाखल

विशेष वृत्त कौतुक नागवेकर

सांगली/प्रतिनिधी : मिरजेत महिलेकडून ५५ हजार रुपये कर्जासाठी साडेतीन लाख रुपये व्याज सावकारांने घेतले ,तुघलकी व्याज घेणाऱ्या पती-पत्नी व वसुली करणाऱ्या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला.नसीम मुबारक सतारमेकर राहणार. झेना साहेब दर्गा पाठीमागे  मिरज या महिलेने २०१९ साली ५५ हजार रुपये कर्ज सर्फराज देसाई त्याची पत्नी शंनो देसाई राहणार. सुंदर नगर मिरज यांच्या कडून घेतले होते. रोज ३०० रुपये व्याज १५०० आठवडा हप्ता देण्याच्या ठरला होता. आज पर्यंत नसीम सतारमेकर यांनी देसाई दाम्पत्याला तीन लाख ५० हजार रुपये परत केले आहेत. तरी सर्फराज देसाई त्याची पत्नी शंनो देसाई व कर्जाचा हप्ता वसुलीसाठी येणार मोहसीन शहापूरे यांनी एक लाख ८४ हजार बाकी आहे. असे म्हणून ४ हजार रुपये महिन्याला हप्ता असे ४६ हप्ते देण्याचे मागत होते. पैसे दिले नाही म्हणून नसीम यांच्या कडून बँकेचा कोरा चेक वर सही करून घेतले.

Advertisements

वारंवार धमकी शिवीगाळ दिल्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून शेवटी नसीम सतारमेकर यांनी मिरज शहर पोलिसांत धाव घेतली खाजगी सावकार पती सर्फराज देसाई त्याची पत्नी शंनो देसाई व कर्ज वसुली करणार मोहसीन शाहापुरे या तिघांच्यावर बेकायदेशीर खाजगी सावकारी करण्याचा गुन्हा मिरज शहर पोलिसांत दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *