Share Now
MEDIA CONTROL ONLINE : देशाच्या १६ व्या राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक होत आहे. तसेच आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. महागाई, अग्निपथ योजना यावरुन विरोधक सरकारला घेरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. मूर्म राष्ट्रपतीपदी नियुक्त झाल्यास त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या असतील. २५ तारखेला राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४८०९ लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असेल. लोकसभेचे ५४३ खासदार, राज्यसभेचे २३३ खासदार आणि ४०३३ विविध राज्यांमधील आमदारांमधून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल.भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल.
Share Now