Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
Breaking News
MEDIA CONTROL ONLINE
पुणे : मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव इथे मोठी दुर्घटना घडली आहे. ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची होती. धार येथून ही बस अंमळनेरकडे निघाली होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे
Share Now