रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे भव्य कराओके गायन स्पर्धा….!

अक्षय खोत -कोल्हापूर/प्रतिनिधी : मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे भव्य कराओके स्पर्धेचे आयोजन दि. ३१/ जुलै/ २०२२ रोजी करण्यात आले आहे. सदर स्पर्धेकरिता रुपये दहा हजार (१०,०००), पाच हजार (५,०००) आणि तीन हजार (३,०००) अशी रोख बक्षिसे आणि पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. ही स्पर्धा ३ फेऱ्या मध्ये होणार असून, पहिली फेरी ऑनलाइन असणार आहे. दुसरी व तिसरी फेरी ही रोटरी समाज सेवा केंद्र नागाळा पार्क कोल्हापूर, येथे पार पडणार आहे. सदर स्पर्धेसाठी रुपये पाचशे प्रवेश फी असून ती रोटरीच्या सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे

       आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ करवीरचे प्रेसिडेंट उदय पाटील आणि सेक्रेटरी स्वप्निल कामत यांनी केले आहे. 

Advertisements

अधिक माहितीसाठी इव्हेंट चेअरमन इरफान बोरगावे 9923118282 आणि माजीद सनदी 9421100100 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.

 

रोटरी क्लब ऑफ करवीर प्रस्तुत मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त,भव्य कराओके स्पर्धा🎤

 पहिले बक्षीस १०,०००/-

  दुसरे बक्षीस ५,०००/-

  तिसरे बक्षीस ३,०००/-

स्पर्धेसाठी नियम व अटी …..

१)दिनांक २७-७-२०२२ पर्यंत आपली विडीओ क्लिप whatsapp नंबर वर पाठवण्याची आहे.

२) खालील दिलेल्या नंबर वर प्रवेश फी ५००/- फोन पे किंवा गुगल पे करायची आहे.

३) प्रवेश फी आलेल्या स्पर्धकाचेच गाणे ग्राह्य धरण्यात येईल.

४)एकूण ३ फेऱ्या असतील..

✅पहिली फेरी ऑनलाइन असेल ज्यात स्पर्धकाने गाण्याची video clip पाठवायची आहे . त्याचबरोबर व्हिडिओ क्लिप च्या सुरुवातीस *स्वतःचं नाव सांगणे बंधनकारक असेल* त्यामुळे ते सांगून तुम्ही गाणं म्हणायचं आहे. 

गाण्याचा एक अंतराच पाठवायचा आहे.

✅दुसरी फेरी हॉल मधे ३० जुलै रोजी live performance असेल .

 ✅तिसरी फेरी live performance ३१ जुलै रोजी ही अंतिम व निर्णायक फेरी असेल

५)परिक्षकांचा निर्णय अंतिम व निर्णायक असेल.

✅स्पर्धेसाठी २०० स्पर्धक च भाग घेऊ शकतात

चला तर मग लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवा आणि तयार रहा एका Musical journey🎤🎼 साठी

टिप-ज्या नंबर वर आपण व्हिडिओ क्लिप पाठवणार आहात त्याच नंबर वर गुगल पे किंवा फोन पे केलेला screenshot पाठवायचा आहे

Google Pay No. 9923118282

                            9421100100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *