मा. नानासाहेब माने यांना विविध मान्यवरांची श्रद्धांजली

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 3 Second

प्रकाश कांबळे कोल्हापूर प्रतिनिधी : गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजी अल्पशा आजाराने वडगावचे माजी आमदार नानासाहेब माने यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. आज रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी रक्षाविसर्जन विधी व शोकसभेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय लेडीज हॉस्टेल याठिकाणी करण्यात आले होते. घटना सल्लागार सुकाणू समितीचे सदस्य बॅरिस्टर तात्यासाहेब तथा शांताराम माने यांचे ते चिरंजीव होते. मा. नानासाहेब माने यांनी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी म्हणून काम केलेले आहे. प्रांताधिकारी या पदावर कार्यरत असताना सन १९७८ साली आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी वडगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार पदाची निवडणूक लढवली व यशस्वी जिंकली. त्यांना आमदार म्हणून सेवा करण्याचा अल्पकाळ  (१ वर्ष ११) महिनेच मिळाला. आमदारकीच्या कालावधीमध्ये जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या माध्यमातून वडगाव परिसरामध्ये उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध केली.

जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीच्या, शाहू जनता शिक्षण संस्था, मिस क्लार्क वस्तीगृह, ब्लू बर्ड इंग्लिश स्कूल इ. शैक्षणिक संस्थांमध्ये दिलेले योगदान अमूल्य आहे. मा. नानासाहेब माने यांच्या जाण्याने शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपस्थिती मान्यवरांनी मनोगताद्वारे व्यक्त केली. आज आदरांजली कार्यक्रमात माजी आमदार राजीव आवळे, मा. कौस्तुभ गावडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) मा. किसनराव कुऱ्हाडे (संस्थापक शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज) मा. मधुकर शेळके (माजी सिनेट सदस्य, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) मा. आलोक जत्राटकर (जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) मा. एल. के. अवघडे (पंचायत समिती सदस्य) मा.  शिवाजीराव आवळे (अध्यक्ष, बंडखोर सेना) मा. शशिकांत कसबेकर, मा. शामराव पाटील, तात्यासो हंडे, मा. तहसीलदार नाईकसो, मा. रमेश जाधव, मा. सदानंद डांगे मा. कृष्णा चौगुले, , मा. सुरेश सावर्डेकर, मा. सुरेश सकटे, मा. टी. एस. कांबळे मा.  संदीप माळी मा. राजेश माने मा. संतोष क्षीरसागर (अध्यक्ष, यल्लूआई पतसंस्था) मा. आर. एस. कांबळे, मा. डॉ. प्रतापराव मधाळे, मा. दयानंद माने, डॉ. प्रशांत गायकवाड, प्रा. विकास आयरेकर, प्रा. एकनाथ जाधव, डॉ. मधुकरराव शिर्के, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. कुटूंबाच्या वतीने प्रा. सतीश माने यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार व्यक्त केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *