Share Now
मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून निवडून आणण्याची जबाबदारी खासदार गिरीश बापट यांच्यावर सोपवली आहे. तसे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
पाटील यांचा विरोधात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिला आहे. पाटील यांना कोथरूडमध्येच अडकवून ठेवण्याचा डाव विरोधकांचा आहे.
बापट यांचा प्रदीर्घ अनुभव व संघटन कौशल्याचा जोरावर भाजपला यश मिळेल, असेही या पत्रात म्हटले आहे. पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच तीव्र विरोध होत आहे.
अशा बातम्याही प्रसारमाध्यमांतून ठळकपणे येत आहेत. खुद्द भाजपची मंडळीच नाराज आहे. त्याची खबर मुख्यमंत्र्यांचा कानावर घालण्यात आली. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बापट यांना आदेश दिल्याची कुजबुज सुरू आहे.
Share Now