#Mumbai : ‘वंचित बहुजन आघाडी’च्या 24 जानेवारीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला अनेक संघटनांचा पाठिंबा -प्रकाश आंबेडकर

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 3 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – NRC आणि CAA विरोधात ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने येत्या 24 जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला 50 हुन अधिक सामाजिक, राजकीय तसेच कामगार आणि विद्यार्थी संघटनांनी पाठींबा दिला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

CAA आणि NRC कायद्याविरोधात विरोधात देशभर विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीने या कायद्याला कडाडून विरोध केला असून 26 डिसेंबरच्या दादर टिटी आंदोलनात पक्ष्याची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली होती, त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.

राज्यात विविध ठिकाणी बंदची तयारी करण्यात येत असून वार्डनुसार बैठका घेण्यात येत आहेत, बंदबाबत अनेक कामगार संघटना, वाहतूक संघटना यांच्याशी बोलणी झाली असून त्यांनीही बंदला पाठिंबा दिला आहे.

राज्यात 50 हुन अधिक सामाजिक,राजकीय संघटना, तसेच विद्यार्थी संघटनांनी बंद मध्ये सामिल होणार असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *