धबधब्याच्या प्रवाहाने दरीत कोसळून सांगलीचा एकजण ठार…!

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 18 Second

कौतुक नागवेकर

सांगली/प्रतिनिधी: सांगली कापड पेठ भागातील नऊ तरुण दोन गाड्यांमधून वेंसर येथील धनंजय बेलवलकर यांच्या घरी निघाले होते यामध्ये कौतुक नागवेकर, प्रवीण निमगुंडा पाटील, रमेश सुतार प्रकाश बाडवणे, प्रकाश सुतार, धनंजय बेलवलकर, उदय बेलवलकर यांच्यासह रोहन चव्हाण देखिल गेला होता.भुईबावडा घाटात एका धबधब्यावर रोहन चव्हाण अंघोळ करताना धबधब्याच्या प्रवाहाने रोहन १०० फूट खोल दरीत कोसळून रोहन याचा मृत्यू झाला.

सायंकाळी साडेपाच वाजता हे सर्व जण अंघोळ करण्यासाठी भूईबावडा घाटातील धबधब्यावर उतरले असता,अचानक जोरदार पाऊस सुरू झालेने धबधब्याचा प्रवाह वाढला. पाण्याचा वाढता प्रवाह पाहून सर्वजण तिथून बाहेर आले. पण बाहेर आल्यावर त्यांना रोहन कुठेच दिसला नाही त्यांनी सगळीकडे रोहनचा शोध घेतला. परंतु त्यांना रोहन कुठेच दिसला नाही त्यांनी लगेच गगनबावडा पोलिसांना हि माहिती दिली.घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पाहाणी केली असता

त्यांना १०० फूट खोल दरीत रोहनचा मृतदेह नजरेस पडला. याची माहिती वैभववाडी पोलिसांना कळवण्यात आली, त्यानंतर पोलीस निरीक्षक अमित यादव पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील अभिजीत तावडे विलास राठोड पडेलकर हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरीत कोसळलेला मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक पथकाच्या मदतीने पोलिसांनी रात्री रोहनचा मृतदेह बाहेर काढला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *