ईडी कार्यालयातील ८ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना अखेर अटक…!

मुंबई/प्रतिनिधी :  संजय राऊत यांची ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांची ईडी कार्यालयातील चौथ्या मजल्यावर चौकशी करण्यातआली. संजय राऊत यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीनं रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला होता.

संजय राऊत यांच्या घरी ईडीनं रविवारी सकाळी छापा टाकला. संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. संजय राऊत यांच्या घरातून पत्राचाळ प्रकरणी एकही कागद ईडीला मिळाला नसल्याची माहिती देखील संजय राऊत यांच्या वकिलांनी दिली. मात्र, दिल्लीतून ईडीचे अधिकारी मुंबईत दाखल झाल्यानंतर राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *