विशेष वृत्त अक्षय खोत
कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ करवीर चे सदस्य रो. प्रविणसिंह उर्फ राजू प्रतापराव शिंदे यांचा वाढदिवस साधेपणाने अन्नदान करून साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी करवीरचे प्रेसिडेंट उदय पाटील प्रमुख उपस्थित होते.
‘कोणताही झगमगाट न करता, जेवणावळींवर पैसे न उधळता गरजू लोकांच्या मुखात घास घालून राजू शिंदे यांनी पुण्याचे काम केले आहे.’ असे उदगार प्रेसिडेंट उदय पाटील यांनी काढले.
सीपीआर हाॅस्पीटल मध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाईकांच्या जेवणाची खूप आबाळ होते. या उद्देशाने सीपीआर चौकात करवीर थाळीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सेक्रेटरी स्वप्निल कामत, कौन्सिलर दिलीप प्रधाने, दिलीप शेवाळे, प्रतापराव शिंदे, प्राजक्ता शिंदे, राहूल जगदाळे, संभाजी पाटील, निशिकांत नलवडे, शितल दुग्गे, प्रमोद चौगुले, निलेश भादोले, इरफान बोरगावे, सुहास मिठारी, नारायण भोई, ॲड. संदीप पवार विक्रम पाटील, संजय पवार आदी उपस्थित होते.