गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन…!

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 38 Second

गडहिंग्लज ,दि.६: आमदार हसन मुश्रीफ यांनी फुटबॉलला किक मारत गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. रुद्राप्पा हत्ती, अप्पासाहेब कोले व शन्मुगम स्मृती चषक शालेय फुटबॉल स्पर्धेत एकूण २४ संघानी सहभाग घेतला आहे. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

१४ व १६ वर्षे अशा दोन गटामध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे हे हे अकरावे वर्ष आहे. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.यावेळी गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद यांनी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.        

यावेळी असोसिएशनची संचालक सुरेश कोळकी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, अभिजीत चव्हाण, गौस मकानदार, अरविंद बारदेसकर समन्वयक शुभम आजगेकर, प्रवीण पोवार, गुंडेराव पाटील, रश्मीराज देसाई, महेश सलवादे, राहुल शिरकोळे, अमर मांगले यांच्यासह क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *