Share Now
Read Time:1 Minute, 22 Second
प्रभाग क्रमांक 14 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई असून दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून रहाते.प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या,टाकाऊ भाज्या यामुळे गटारी चोक अप होऊन सदर मंड ई मध्ये दुर्गंधी चे साम्राज्य पसरते.भाजी विक्रेते आणि ग्रिर्हाईक यांना मोठी समस्या निर्माण होते.तरी तातडीने क्राॅस पाईप लाईन टाकण्यात येऊन कायमचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर मा.आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन दिले.
स्वातंत्र्य महोत्सव हर हर घर तिरंगा ध्वज अभियान साठी प्रभाग मध्ये फिरणार्या कचरा घंटा गाडी वर देशभक्ती वर गिते लावावी.यासाठी निवेदन दिले.जेणे करून नागरिकांमध्ये तसेच शाळा काॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये पण देशाविषयी जागरूकता निर्माण होईल.
Share Now