विशेष वृत्त: प्रकाश कांबळे/ वाठार ता हातकणंगले येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने आजपासून सामूहिक राष्ट्रगीत गायनाने सुरुवात केली.
या वेळी ग्रामविकास अधिकारी डी डी शिंदे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली ते म्हणाले कि ग्रामपंचायतीच्या वतीने वाठार गावातील प्रत्येक कुटुंबास मोफत तिरंगा ध्वज पुरविण्यात येणार असून तो 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपआपल्या घरावरती फडकविण्याबाबत आवाहन केले यावेळी सरपंच तेजस्विनी वाठारकर उपसरपंच राहुल पोवार ग्रा पं सदस्य सागर कांबळे, गजेंद्र माळी, सुशीला चौगुले, अश्विनी कुंभार क्लार्क संभाजी भोसले, विशाल कांबळे, शिवाजी गायकवाड, महेश कुंभार, सुनील कांबळे, पत्रकार प्रकाश कांबळे,गोविंद शिंदे,दत्त सोसायटी संचालक बागल पटाईत, उमेश पाटील यांच्यासह कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर, साखरवाडी विद्या मंदिर, निवळे वसाहत विद्या मंदिर या सर्व शाळातील शिक्षक शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्राथमिक आरोग्य केंद्र कृषिकन्या,तलाठी,गावकामगार पोलीस पाटील सुगंध समुद्रे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.