Share Now
Read Time:1 Minute, 0 Second
मुंबई – मंगळवारी ऑगस्ट क्रांतिदिनाचा मुहूर्त साधत होत असलेल्या या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांची; तर शिंदे गटाकडून दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे यांची कॅबिनेट मंत्रिपदासाठी नावे निश्चित झाली आहेत. राजभवनात सकाळी या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रीमंडळात नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असून, दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी नऊ असे एकूण १८ मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते.
Share Now