पन्हाळा प्रतिनिधी/शहादुद्धीन मुजावर, गेले चार-पाच वर्ष पन्हाळा स्वच्छतेबाबत महाराष्ट्र राज्यात विविध पारितोषिक विजेता ठरला आहे. त्यातच भर म्हणून आज पन्हाळा नगरपरिषद “माझी वसुंधरा अंतर्गत ” पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद ला तिसरा क्रमांक आज संध्याकाळी घोषित झाले आहे. २०२२ मध्ये पुणे विभागात प्रथम तर राज्यात पन्हाळा चा चौथा क्रमांक आला होता.
राज्यस्तरीय चौथ्या गटामध्ये , १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट राज्यस्तर स्थानिक संस्थेचे अंत्तीम निकाल खालील प्रमाणे आज जाहिर करण्यात आले आहेत. , १ पांचगणी नगरपरिषद २, महाबळेश्वर नगरपरिषद ३.पन्हाळा नगरपरिषद पन्हाळा रु. १.५० कोटी रक्कम आज बक्षीस संध्याकाळी जाहीर झाले.
” माझी वसुंधरा अभियान ४.० ” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आली होती. माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.
सदर बक्षिस रक्कमेचा विनियोग हा निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय योजना हाती घेण्यासाठी करण्यात येणार आहे. सदर उपाय योजनां पैकी काही उपाय योजना उदा, दाखल खाली नमूद केल्या आहेत, शहराचे / गावाचे हरित अच्छादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाय योजना (जैवविविधतेच्या संवर्धनासह) उदा,(अ) मियावाकी वृक्षारोपण (ब) अमृत वन (क) स्मृती वने (ड) शहरी वने (इ) सार्वजनिक उद्याने २) जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल (जैवविविधतेच्या संवर्धनासह) ,रोप वाटीकांची निर्मिती, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन हरवेस्टिंग व परलेशन , नदी, तळे व नाले यांचे पुनःर्जिविकरण , नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या उपाय योजना ,सौरउर्जेवर चालणारे / एलईडी चालणारे दिवे , विद्युत वाहनांना प्रोत्साहन चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे. इत्यादी कामे आलेल्या बक्षीस मधून करण्यात येणार आहेत. अशी माहिती पन्हाळा नगरपरिषदेची मुख्यअधिकारी, चेतनकुमार माळी यांनी आपल्या माध्यमाला माहिती दिली.