महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि महायुतीला निर्विवाद कौल दिला. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे माझ्यासह तमाम भाजप कार्यकर्त्यांना आनंद आणि समाधान वाटत आहे. नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नूतन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातून महाराष्ट्राची अधिक गतिमान प्रगती होईल. पुढील पाच वर्षात महाराष्ट्र, देशातील सर्वात विकसित राज्य असेल, याची खात्री वाटते. जनतेच्या इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करणारे महायुतीचे सरकार, पुन्हा सत्तेवर आले आहे. ही संधी दिलेल्या जनता जनार्दनाचे आणि नूतन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांचेही मनापासून अभिनंदन..