शनिवारपासून होणार एक दिवस आड पाणी पुरवठा….!

कोल्हापूर : शिंगणापूर अशुध्द जल उपसा केंद्राकडील एक पंप नादुरूस्त झालेने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या भागास पंप दुरूस्त होईपर्यत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून ई वॉर्ड व सलग्नीत […]

न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन….!

कोल्हापूर : युवकांनी सुरक्षितपणे वाहन चालवून स्वतःच्या जीवाचे संरक्षण करत कुटुंबाचे आणि राष्ट्राचे हित जपावे, असा मौलिक सल्ला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दिला.          रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक […]

कागल मध्ये मुश्रीफ समर्थक आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की….!

विशेष वृत्त अजय शिंगे  कागल : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना प्रकरण संदर्भात ईडीने आणि आयकर विभागाने ही सर्व धाड मारली आहे. त्यामुळे मुश्रीफ समर्थक खूपच […]

पी.ओ.पी वरील बंदी संदर्भात महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट….!

कोल्हापुर : पी.ओ.पी.वर संशोधन असणाऱ्या शास्त्रज्ञांची व मूर्तिकारांची मते विचारात घ्यावीत यासह राज्य शासनामार्फत केंद्र शासन व मे.न्यायालयाकडे सादर करण्यात येणारा अहवाल कुंभार समाजाकरिता सकारात्मक असावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना.एकनाथ […]

श्री सद्गुरुदास महाराजांचा धर्म भास्कर सन्मान प्रधान..

श्री सद्गुरुदास महाराजांना धर्मभास्कर सन्मान प्रदान सोहळा बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 ला प.पू. सरसंघचालक  मोहनजी भागवत, संकेश्वर पीठाचे पूज्यपाद शंकराचार्य तसेच अनेक संत – महंत आचार्य वे.शा. सं.महानुभावांची उपस्थिती. दिनांक 10 जानेवारीला सायं.भव्य रथयात्रा […]

लिंगाप्पा यमनाप्पा गड्डे यांचे निधन !

दुःखद निधन आपले मित्र व युवा पत्रकार संघाचे राज्य सदस्य सदानंद गड्डे यांचे वडील लिंगाप्पा यमना गड्डे व व (76) यांचा आज थोड्या वेळा पुर्वी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण […]

ऑनलाइन पत्रकारितेच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या मेळावा….!

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नालिझम या अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवार दि. ८ जानेवारी रोजी अध्यासनाच्या नवीन इमारतीत आयोजित केला […]

देशी खेळांना देणार प्रोत्साहन महाराजा अग्रसेन स्पोर्ट्स अकॅडमीचे नवनियुक्त राज्य संयोजक नितीन अग्रवाल यांचे आश्वासन….!

कोल्हापूर : अखिल भारतीय अग्रवाल परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग यांनी पुण्यातील तरुण आणि हरहुन्नरी नितीन अग्रवाल यांची महाराजा अग्रसेन स्पोर्ट्स अकादमी महाराष्ट्राच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. या पदाचा स्वीकार करत नितीन अग्रवाल […]

उपेक्षित ,वंचिताना अन्नदान उपक्रमाच्या माध्यमातून युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा ….!

कोल्हापुर (विशेष प्रतिनिधी शरद माळी) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यानी स्थापन केलेल्या ‘दर्पण’ दैनिकाचा स्थापना दिवस ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो .या दिवसाचे औचित्य साधून उपेक्षित […]

कोल्हापूर डिजिटल मीडियाचे पुरस्कार जाहीर…!

कोल्हापूर : कोल्हापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने शुक्रवारी, दि. ६ जानेवारीला मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटनेचे […]