कोल्हापूर : परीक्षा पे चर्चा पर्व ६ या उपक्रमाअंतर्गत महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आयोजीत चित्रकला स्पर्धेत ३८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हि स्पर्धा शहर हददीतील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महावीर गार्डन येथे सकाळी ८ ते १२ या वेळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेचे नियोजन प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तर शैक्षणीक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, दादासाहेब मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद, कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील यांनी या स्पर्धेचे नियोजन केले. यासाठी कला शिक्षक म्हणून नागेश हंकारे, प्रशांत जाधव, विकास कुलकर्णी, रमजान मुल्ला, विश्वास माळी, शरद घाटगे, दत्तात्रय चौगुले, शितल होगाडे, जितेंद्र कबाडे, अनिल अहिरे, सरिता सुतार, राजश्री पाटील, सुनील गोंधळी, गजानन धुमाळे यांनी कामकाज पाहिले. या कार्यक्रमावेळी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांना माझी वसुंधरा अभियानाची शपथ दिली.
या चित्रकला स्पर्धेत G२० जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरण मध्ये भारत न. १, पंतप्रधानांच्या जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योग दिन – मोदींजिनी वेधले जगाचे लक्ष, बेटी बचाव बेटी पढाव, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला- मोदींचा संवेदनशील निर्णय हे विषय देण्यात आले होते.
या चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी सुहास गाडे, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, महापालिकेचे उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, माजी नगरसेवक सत्यजित नाना कदम, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, विजयसिंह खाडे-पाटील, उमा इंगळे, विजय सुर्यवंशी, चंद्रकांत घाटगे, धीरज ऊलपे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय ओतारी, विवेक कुलकर्णी, विजयेंद्र माने, चंद्रकांत घाटगे, विवेक कुलकर्णी, धीरज ऊलपे, अतुल चव्हाण, डॉ के एन पाटील, रुपेश आदुळकर आदी उपस्थित होते.
या चित्रकला स्पर्धेच्या निकाल स्पर्धा संपल्यानंतर लगेच देण्यात आला. यामध्ये गट ९ वी ते १० वी मधील प्रथम क्रमांक विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूलमधील अभिषेक सुर्यवंशी, द्वितीय क्रमांक मोहित प्रफुल्ल सुतार व तृतीय क्रमांक उषाराजे हायस्कूलमधील ईश्वरी उतरंदे यांनी पटकाविला. तर गट ११ वी ते १२ वी मधील प्रथम क्रमांक नेहरू ज्युनिअर कॉलेजमधील पवन हातगिने, द्वितीय क्रमांक डी डी शिंदे सरकार कॉलेजमधील श्रावणी बालकर व तृतीय क्रमांक राजाराम महाविद्यालयातील तन्वी देसाई यांनी पटकाविला. विशेष गट (दिव्यांग, कर्णबधिर, मूकबधिर) इ. ९ वी व १० वीमधील प्रथम क्रमांक स. म.लोहिया हायस्कूलमधील आतिषकुमार बागाव, द्वितीय क्रमांक हर्षद पाटील व तृतीय क्रमांक राजर्षी शाहू महाराज हायस्कूलमधील विनायक कदम तर ११ वी व १२ वी मधील प्रथम क्रमांक स. म.लोहिया हायस्कूलकडील प्रेम आईट, द्वितीय क्रमांक राहील कागदी व तृतीय क्रमांक मैथिली माने यांनी पटकाविला.