कोल्हापूर : आपला संपूर्ण देश कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना जैव वैद्यकीय निर्मुलन संस्था नियमबाह्य कामामुळे तसेच जैव वैद्यकीय कचरा अधिनियमाचे उल्लंघन केल्यामुळे एका फॅॅसिलीटीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने त्यांना काम पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले असताना २३ डिसेंबर २०२२ ला नियमबाह्य कोणतीही परवानगी न घेता रुग्णालयातील घातक जैव वैद्यकीय कचरा उचलून मानव व प्राणी मात्रांचे आरोग्य धोक्यात आणल्याने प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पंचनामा करून कारवाई करण्यात आली. यामध्ये प्लासेंटा सह पीपीई किट सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर फॅॅसिलीटीवर केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने सदर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यासाठी तसेच न्यायालयात दाखल करण्यासाठी दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजुम देसाई यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
दुसऱ्या निवेदनात कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्द व शहरी भागातील रुग्णालये यांना १० बेडच्या वर बेडसंख्या असलेल्या रुग्णालयांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभा करणे अनिवार्य असताना मोजक्याच रुग्णालयांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभारून इतर रुग्णालये बायो हजार्डचे पाणी गटारी, नाल्याद्वारे थेट पंचगंगेत सोडत असल्याने पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे अशा दोषी रुग्णालयांवर कारवाई साठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभे न करता बॉम्बे अॅक्ट नर्सिंगचे परवाने घेणाऱ्या रुग्णालयांची नावे आणि ग्रामपंचायत व शहरी भागात बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलीटी जॉईन न झालेल्या डॉक्टर्स व रुग्णालयांची नावाची यादी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सदर दोषी रुग्णालये व डॉक्टर्स यांच्यावर दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजुम देसाई यांनी राष्ट्रीय हरित अधिकरण (NGT) येथे दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.