विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या संकल्पनेसाठी आज कोल्हापूरात, कोल्हापूर पोलिस अधिक्षक यांच्या सुचणेनुसार कोल्हापूर पोलिसगन यांच्या तर्फे रूट मार्श रॅली काढण्यात आली. प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहचवण्यासाठी या रॅली मधून एक सुंदर संदेश देण्यात आला.या रॅली द्वारे आपल्या देशाची शान आसलेल्या तिरंग्याचे महत्व पटवून देण्याचे काम केले.
कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकातून या रॅलीची सुरुवात झाली मिरजकर टिक्की मार्गे बिन खांबीपर्यंत रॅली येतात पावसाला सुरुवात झाली आणि या राहिलेला एक वेगळेच सुंदर असे रूप प्राप्त झाले. हातामध्ये ध्वज घेऊन शेकडो पोलिस वाजत गाजत महाद्वार रोड मार्गे पापाची तिकटी तेथून सरळ महानगरपालिका आणि शिवाजी चौकात या रॅलीचा सांगता झाला. तिरंग्याचे महत्व पटवून देणारी ही रॅली खूपच आकर्षक होती. रॅली पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमत होती. ज्या मार्गी रॅली जात होती तिथे लोक फोटोज आणि व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात घेत असताना दिसून आले. बँड पथकाच्या देशभक्तीपर संगीत वादकाने छत्रपती शिवाजी चौक परिसर मध्ये उपस्थीत लोक देशभक्ती मध्ये विलीन झाले होते.