घरफाळा थकबाकीपोटी सात दुकानगाळे सिलबंद

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 29 Second

कोल्हापूर ता.04 : महानगरपालिकेच्या घरफाळा विभाग अंतर्गत थकबाकीदार मिळकत धारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली असून सदरची मोहिम घरफाळा विभागाच्या जप्ती पथकाने आज आणखी तीव्र राबविली आहे. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी व कर निर्धारक व संग्राहक श्री संजय भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आज विभागीय कार्यालय क्रं. 4 कावळा नाका घर फाळा विभागाने पितळी गणपती जवळील प्रतिराज कॉम्पलेक्स, या परिसरात कारवाई करून थकबाकीपोटी 3,74,471/- रक्कमेसाठी सात दुकानगाळे सिलबंद केले. सदर मिळकती ह्या प्रतिराज कॉम्प्लेक्स मधील भोगवटदार अमित वणकुद्रे यांचे असून त्यांचे करदाता क्रमांक 175164 ते 67 व 175171 ते 73 असे एकूण 7 दुकानगाळे सिलबंद करणेत आले. तसेच भागात फिरती करून रक्कम रूपये 2,50,000/- धनादेश आशुतोष देसाई यांचेकडून वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे कसबा बावडा परिसरातील रहिवाशी थकीत मिळकतधारकांना कराची रक्कम तात्काळ भरणेबाबत अंतीम सूचना देणेत आल्या. मालमत्ता करदाता क्रमांक 168770 या मिळकतीचा हॉटेल वृंदावन कडील रक्कम रूपये 3,67,370/- इतक्या रक्कमेचा धनादेश भरणा करण्यात आला.
सदरची कारवाई कावळा नाका विभागाकडील प्र. कर अधिक्षक विजय वणकुद्रे, भगवान मांजरे, सुनिल घाटगे, मनिष अतिग्रे, महेश आगळे, प्रशांत धामणे, जैलानी शेख, सचिन लोखंडे, अरविंद कोळेकर यांनी पार पाडली. शहरातील मिळकतधारकांनी त्यांच्या मिळकतीचा घरफाळा तात्काळ नागरी सुविधा केंद्रात अथवा ऑनलाईन भरून दंड अथवा जप्ती सारख्या कटु प्रसंग टाळावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *